MSRTC नाशिक भरती 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ( MSRTC ) नाशिक यांनी नवीन पदांची भरती जाहीर केली असून पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये नोकरी करायची असेल तर ही एक तुमच्यासाठी चांगली सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या जाहिरातीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी सदरील लेख पूर्ण वाचावा.
• पदाचे नाव – समुपदेशक
• शैक्षणिक अहर्ता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी ( M.S.W. ) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी ( M.A. Psychology ) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका ( Advance Diploma in Psychology )
• एकूण पदे – 04
• नोकरी ठिकाण – नाशिक
• अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – 11 जुलै 2024
• अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2024
• अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन ( Offline )
-वरील अहर्ता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुलस्केप पेपरवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिकटवावा व अर्जासोबत शाळा सोडल्या बाबतचा दाखला , शैक्षणिक अहर्ता बाबत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा. सदर अर्ज आपण या विभागात समुपदेशक म्हणून काम करण्यास इच्छुक असाल तर रा. प. नाशिक विभागाच्या ‘विभाग नियंत्रक’ यांच्या नावे विभागीय कार्यालय यांच्याकडे दि. 26/02/2024 पर्यंत पोहोचेल या बेताने पाठवावा. याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय एन. डी. पटेल रोड , शिंगाडा तलाव , गडकरी चौक , नाशिक -422001 या कार्यालयाशी संपर्क साधावा.
• अर्ज पाठवण्याचा पत्ता – विभाग नियंत्रक , विभागीय कार्यालय , एन. डी. पटेल रोड , शिंगाडा तलाव , गडकरी चौक , नाशिक – 422001.
• अनुभव – समुपदेशन क्षेत्रातील शासकीय / निम-शासकीय / मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान 2 वर्षाचा अनुभव.
• इतर अटी व शर्ती – रा. प. महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुपदेशकांची मानद तत्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन ₹4000/- देण्यात येईल. प्रथम 1 वर्षासाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणूक देण्यात येईल. सदर काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरवण्यात येईल.
• नेमणुकीचा कालावधी – सदर नेमणूक निव्वळ मानद तत्वावर असून नेमणुकीचा कालावधी एक वर्ष राहील. आवश्यकता वाटल्यास समुपदेशकाचा कार्यकाल विचारात घेऊन नेमणुकीचा कालावधी विभागामार्फत वाढवण्यात येईल. – सदर नियुक्ती मानदतत्त्वावर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे/सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार/हक्क अर्जदारास समुपदेशकास नसतील. तसेच सक्षम प्राधिकारी /नियुक्ती प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
Join Us On WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us On Telegram | येथे क्लिक करा |