Teachers Requirement 2024 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळवण जि.नाशिक येथे अधिनस्त शासकीय आश्रमशाळांतील रिक्त पदांवर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी तासिका शिक्षक नेमुक करण्यात येणार आहे.
प्रकल्प कार्यश्रेत्रातील 40 शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्त असणाऱ्या प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक या रिक्त पदांच्या संख्येनुसार अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात शैक्षणिक पात्रतेनुसार रोजंदारी तासिका नेमणूक होणार आहे.
भरती विभाग : आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी , एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळवण जि.नाशिक
भरती प्रकार : अत्यंत तात्पुरत्या स्वरूपासाठी
पदाचे नाव व पात्रता :
1) प्राथमिक शिक्षक – डीएड अथवा समकक्ष व टीईटी/सीटीईटी पात्र
2) माध्यमिक शिक्षक – बिएड
3) कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक – संबंधित विषयात पदव्युतर पदवी व बिएड
अर्ज पद्धती – ऑफलाईन ( Offline ) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत .
अर्ज सदर करण्याची प्रक्रिया – उमेदवारांनी आपले लेखी अर्ज प्रकल्प कार्यालय कळवण येथे प्रत्यक्ष करावे.
सोबत उमेदवाराने धारण केलेल्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेसंबंधी कागदपत्रांच्या छायांकित प्रति जोडणे .
अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र जोडा .
भरती कालावधी – सदर शिक्षक नियुक्तीही अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका कर्मचारी म्हणून करण्यात येणार आहे.निवड झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यास भविष्यात नियुक्ती साठी हक्क सांगता येणार नाही.
तासिका कर्मचाऱ्याच्या जागेवर नियमित कर्मचारी हजार झाल्यास त्याची रोजंदारी कर्मचाऱ्याची सेवा आपोआप संपुस्ठात येईल.
Offline अर्ज करण्याचे ठिकाण – एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , कळवण
नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत , कोल्हापूर फाटा , कळवण – नाशिक रोड , कळवण
प्रकल्प कार्यालय संपर्क क्रमांक – 02592250101
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 12 जुलै 2024